Yavatmal Corona & Lockdown | यवतमाळमध्ये कोरोनामुळे जमावबंदी, कोरोनाला ब्रेक लागणार?
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं यवतमाळमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलंय. सोशळ डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 75 संयुक्त पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.