सैनिकांसाठी 'रँचो'चा नवा आविष्कार, बोचऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी सोनम वांगचुक यांनी बनवला खास तंबू
लडाख: लडाखच्या भूमीवर जवळपास 12 हजार फुटाच्या उंचीवर आपले जवान रात्रंदिन देशाची सेवा करत असतात, पहारा देत असतात. या ठिकाणी रक्त गोठणारी थंडी असते. अशाही स्थितीत भारतीय जवानांना शत्रुवर नजर ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागतं रहावं लागतं. आता यावर सोनम वांगचुक यांनी एक अनोखा उपाय शोधलाय. त्यांनी अशा तंबूचा शोध लावलाय की त्यात -14 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाला देखील जवानांना काहीच थंडी वाजणार नाही.