Elon Musk : ट्विटर ईलोन मस्क यांच्या मालकीचं, CEO Parag Agarwal यांचं काय होणार?
Continues below advertisement
टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख असलेल्या ईलोन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी केलं. ट्विटरची मालकी मस्क यांच्याकडे आल्याने पराग अग्रवाल यांचं काय होणार याची उत्सुकता लागलीय. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल हे आपल्या पदावर कायम राहणार की पद सोडणार? याविषयी देखील चर्चा सुरू झालीय. पराग अग्रवाल यांना पदावरुन हटवल्यास ट्विटरला 4.2 कोटी डॉलर्स अर्थात 3.2 अब्ज रुपये मोजावे लागणार आहेत. नोव्हेंबर 2021मध्ये पराग अग्रवाल यांनी जॅक डॉर्सी यांच्याकडून ट्विटरचं सीईओपद हाती घेतलं होतं. डील झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचं भविष्य अनिश्चित असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान मस्क यांची ट्विटर खरेदीची डील टेस्लाच्या गुंतवणूकदारांना फारशी रुचली नसल्याचे समोर आलंय. टेस्लाचे 9 टक्क्यांहून अधिक शेअर गडगडल्याचे पाहायला मिळालं.
Continues below advertisement