Kirit Somaiya यांना मोठी दुखापत न झाल्याचा अहवाल, 0.1सेमीची जखम,सूज नाही, रक्तस्त्राव नाही

Continues below advertisement

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (23 एप्रिल) झालेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. किरीट सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात किरीट सोमय्या यांना 0.1 सेंटीमीटरची जखम असल्याचं आढळून आलं आहे. यासोबत सूज नव्हती आणि रक्तस्रावही नव्हता असं भाभा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram