PM US Tour : मोदी-बायडेन भेटीतून काय अपेक्षा? कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? कौमुदी वाळिंबे यांचं विश्लेषण

Continues below advertisement

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भेट घेतली. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे. 

उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जर त्या भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram