Volodymyr Zelenskyy : आम्हाला युध्द नको, युध्द थांबवा, अमेरिकेच्या संसदेत झेलेन्स्कीचं आवाहन
रशिया-युक्रेन युद्धाचा आज 21वा दिवस आहे. त्यातच नाटोमध्ये सहभागी होणार असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी केलंय. रशियाचे सार्वभौमत्व कमी होत असल्याने युक्रेनचं नाटोमध्ये सहभागी होणं हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना मान्य नाही असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. आता युक्रेनला संकटाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे नाटोमध्ये सामील होणार नाही हे युक्रेनियन नागरिकांनी समजून घेणं आवश्यक असल्याचे वक्तव्य झेलेन्स्की यांनी केलंय. नाटो आणि पाश्चात्य देशांवरही झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केलीय. रशियन सैन्य हळूहळू युक्रेनच्या भूमीवर कब्जा करतंय. राजधानी किव्हसह अनेक शहरं ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याकडून हल्ले सुरु आहेत. युक्रेनच्या सैन्याकडूनही रशियन हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जातंय. या युद्धात दोन्ही सैन्याचं नुकसान झालंय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निर्णय देणार आहे.