Vienna Terror Attack | ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात दहशदवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

युरोपीयन देश ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला झाला असून दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका अतिरेक्याला ठार केलं आहे. परंतु, या अतिरेक्याच्याच शरीराला बॉम्ब लावल्याण्यात आला होता.

व्हिएन्नामध्ये मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून त्याच्या शरीरावर बॉम्ब बांधण्यात आला होता. दहशतवाद्याच्या शरीरावर बांधण्यात आलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलिसांचं एक पथक पाचारण करण्यात आलं होतं. या पथकाला दहशतवाद्याच्या शरीरावर बांधण्यात आलेला बॉम्ब निकामी करण्यात यश आलं आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी काही लोकांना वेठीसही धरलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola