ST Worker Corona Positive | मुंबईहून सांगलीला परतलेल्या आणखी 46 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
ST Worker Corona Positive | मुंबईहून सांगलीला परतलेल्या आणखी 46 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याआधी मुंबईहून सेवा बजावून सांगलीत परतलेल्या 9 एसटी डेपोंमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं कोरोना संकटामुळे थांबलेल्या सेवा पूर्ववर्त करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासाला परवानगी दिली होती. त्यानंतर मुंबईत सेवा बजावून सांगली जिल्ह्यात परतलेल्या एस.टी मधील चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा 100 वर गेला होता. आतापर्यंत जिल्ह्यांतील 9 डेपोमधील 100 हून अधिक चालक-वाहक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले होतं. अशातच आता यामध्ये आणखी 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे एस.टी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.