अमेरिकेत निवडणुकीनंतर हिंसाचाराची शक्यता, वॉशिंग्टनमध्ये संरक्षणासाठी खिडक्यांना प्लायवूडचं कव्हर

Continues below advertisement
जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचं मोठं आव्हान आहे. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल.

अमेरिकेत निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या शक्यतेमुळे अभूतपूर्व सुरक्षा घेतली जात आहे. वॉशिंग्टनमध्ये संरक्षणासाठी खिडक्यांना प्लायवूडचं कव्हर लावण्यात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram