Russia Ukraine सीमेवर युद्धाचे ढग, युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता
रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग अधिक गडद होताना दिसतायत आणि त्यामुळे जगभराची चिंता वाढलेय... रशियानं अचानक आक्रमक पवित्रा घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेय. युक्रेनमधील डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहेत. आणि त्यांनाच स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देणाऱ्या करारावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. एवढंच नव्हे तर आता रशियानं या दोन्ही प्रांतात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केलेय. रशियन जनतेला संबोधित करताना रशियानं युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासही नकार दिलाय. मात्र रशियाच्या या पवित्र्यानं जगभरात खळबळ उडालेय. फ्रान्स, अमेरिका, जर्मनी रशियाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही या घटनेनंतर आपत्कालीन बैठक बोलवली आहे. याचं अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिलेय.