Turkey Earthquake : तुर्कीतील भूकंपामुळे अवघ्या जगानं काय गमावलं? पाच दिवसांही बचावकार्य सुरु
सध्या तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे अवघं जग हादरंलय. तुर्कीला अनेक देशांकडूनही मदतीचा हात मिळालाय. मात्र भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर येथील परिस्थिती फार बिकट झालीय. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक तास उलटून गेले आहेत. या भूकंपातील मृतांचा आकडा 23 हजारांच्या पुढे गेला आहे. अद्यापही ढीगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरुच आहे. या ढीगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यातील महिला आणि तिच्या तिन्ही मुलांवर सध्या उपचार सुरु आहेत. सध्या तीच्या तिन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे.