Turkey Earthquake: तुर्कीतील भूकंपानंतर भारताकडून 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत त्वरित तुर्कीला मदतीचा हात

Continues below advertisement

तुर्कीतील भूकंपानंतर भारतानं ऑपरेशन दोस्त अंतर्गत त्वरित तुर्कीला मदतीचा हात दिलाय.. भारताची एनडीआरएफची मदत पथकं तिथे अहोरात्र झटून मदतकार्य करत आहेत... तुर्कीच्या नूरदागी भागात एनडीआरएफच्या पथकानं कोसळलेल्या इमारतीच्या राडरोड्यातून एका ६ वर्षाच्या चिमुरडीला सुरक्षित बाहेर काढलंय.. यात एनडीआरएफच्या डॉग स्क्वॉडनं महत्वाची भूमिका बजावली.. एक पुरुष, एक महिला आणि एक वृद्ध महिला यांच्या मृतदेहांमध्ये ही चिमुरडी सुरक्षित होती. ज्या कुटुंबानं आपल्या चिमुकलीला वाचवताना जीव दिला त्या कुटुंबाचं बलिदान एनडीआरएफनं व्यर्थ जाऊ दिलं नाही... प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी या चिमुकलीला जिवंत बाहेर काढलं. गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून एनडीआरएफचं कौतुक केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram