Taliban Latest News : तालिबान,पाकिस्तानला मोठा झटका,हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या
abp majha web team
Updated at:
03 Nov 2021 10:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. पाकिस्तानच्या आशीर्वादानं प्रभावी ठरलेल्या हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिस याची दहशतवाद्यांनी हत्या केलीय. आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्याला मारल्याचं सांगितलं जातंय. काबुलमध्ये आत्मघाती हल्ल्यात कमांडर हमदुल्ला मुखलिस मारला गेला. तालिबान सरकारमधील गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचा रणनीतीकार अशी त्याची ओळख होती. काबूलचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या कार्यालयात हमदुल्ला सगळ्यात आधी घुसला होता. त्यावेळी गनी यांच्या खुर्चीवर बसलेले त्याचे फोटो व्हायरल झाले होते.