तालिबान्यांचा Afghanistan मध्ये गोळीबार, नागरिकांचं मुंडन आणि भारताला धमकी : ABP Majha
Taliban Enters Kabul: अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल गनी ब्रार दोहाहून काबुलला पोहोचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती होऊ शकतात. अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तालिबान सत्ता हस्तांतरणाच्या तयारीसाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी जात आहेत. या अधिकाऱ्याने रविवारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या बैठकीचा उद्देश शांततापूर्ण पद्धतीने तालिबानला सत्ता सोपवणे आहे. तालिबानने सांगितले की, बळजबरीने सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा हेतू नाही.
तालिबानने काबुलवर कब्जा मिळवताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन करण्याचा निर्णय घेतला. आता तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनवर पूर्ण कब्जा मिळवला आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल घनी ब्रार हा अफगाणिस्तानचा सत्ताधीश म्हणून काम करु शकतो.