Afghanistan : अफगाणिस्तानमधील दुसरं मोठं शहर कंदहारवर तालिबान्यांचा कब्जा

Continues below advertisement

काबुल : अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगाने चिघळत असून देश अनागोंदीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. देशातील दुसरं मोठं आणि महत्वाचं शहर असलेल्या कंदहारवर आता तालिबान्यांनी कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. तालिबानी दहशतवादी आता ज्या वेगाने एक-एक प्रदेशावर कब्जा मिळवत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी आता राजधानी 'काबुल दूर नही' अशी काहीशी परिस्थिती आहे. 

 

तालिबान्यांनी कंदहारवर कब्जा मिळवल्यानंतर आता ते काबुलकडे कूच करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तालिबान्यांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करु नये असंही सांगितलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram