Russia Corona Medicine Success! रशियातील विद्यापीठात कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी यशस्वी

मॉस्को : रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने (Sechenov University) कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. सर्व चाचण्या पूर्ण करणारी ही जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल. सेशेनोव्ह विद्यापीठ रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहे.

कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती सेशेनोव्ह विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलॅशनल मेडिसीन आणि बायोटेक्नॉलॉजी (Institute for Translational Medicine and Biotechnology) चे संचालक वादिम तारासोव्ह यांनी ही माहिती रशियातील अधिकृत वृत्तसंस्था स्पुटनिकला दिली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola