Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आर्थिक अराजकता निर्माण होण्याची शक्यता, राष्ट्रपतींविरोधात निदर्शनं

Continues below advertisement

Sri Lanka News: भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (9 एप्रिल) हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. आज देखील तरूणांचा मोठा समूह राजपक्षे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र कोलंबो येथे पाहायला मिळत आहे. अशातच देशातील मोठ्या व्यापारी समुदायानेही राष्ट्राध्यक्षांना पाठिंबा काढून घेण्यास सुरुवात केल्याने राजपक्षे यांच्यावरील दबाव वाढला आहे. 1948 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर श्रीलंकेतील 22 दशलक्ष लोकांना पहिल्यांदाच अशा भीषण मंदीचा सामना करावा लागत आहे. देशात गेल्या काही आठवड्यापासून वीज कपात, अन्न, इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram