Sri Lanka Crisis : श्रीलंकेत रात्री लष्कराने पूर्ण परिसर आंदोलकांच्या ताब्यातून काढून घेतला

Continues below advertisement

गेल्या आठवड्याभरावपासून श्रीलंकेतील विविध सरकारी इमारतीं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी आपलं आंदोलन २० जुलैपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय.  सध्या राष्ट्रपती भवन, जुनं संसद भवन, आणि पंतप्रधान कार्यालयावर आंदोलकांचा कब्जा आहे... मात्र पंतप्रधान भवनातील महत्वाच्या दस्तावेजांना यामुळे धोका निर्माण झालाय. खबरदारी म्हणून श्रीलंकेच्या लष्करानं संसदेबाहेर रणगाडे आणि सैन्य तैनात करण्यात आलंय. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशाबाहेर पळून गेले आहेत. मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये. त्यामुळे आंदोलकांमध्ये अजूनही संताप आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram