अफगाणिस्तानातल्या स्त्रियांचे हक्क कुणी हिरावले? का आणि कसं बदललं Afghanistan ?

Taliban News: अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या अधिकारांचा आदर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांनी तालिबानच्या अधिकाऱ्यांनी हेरात प्रांतातील सरकारी आणि खाजगी विद्यापीठांमध्ये मुला-मुलींना एकत्र शिकण्यास बंदी घातली आहे. सोबतच या गोष्टीला समाजातील सर्व वाईट गोष्टींचे मूळ म्हटलं आहे. खामा प्रेस या वृत्तसंस्थेने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, विद्यापीठातील प्राध्यापक, खाजगी संस्थांचे मालक आणि तालिबान अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात अचानक सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानचा हा पहिला 'फतवा' आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola