Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाचा सहावा दिवस, किव्हसह अनेक शहरात हल्ले सुरुच
Russia Ukraine War : युक्रेनच्या सैन्याकडून रशियन फौजांचा कडवा प्रतिकार सुरू आहे. युक्रेनला नमवण्यासाठी रशियाकडून आता घातक बॉम्बचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या राजदूतांनी अमेरिकेत हा आरोप केला आहे. रशियाने युक्रेनमध्ये आता क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) आणि व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum Bombs) वापर करण्यात येत आहे.