Afghanistan UNSC Meet : अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट, भारताच्या अध्यक्षतेखाली UNSC ची आज बैठक

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली असून याच विषयावर भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola