Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध संपण्याची चिन्हं ABP Majha
Continues below advertisement
गेल्या ३४ दिवसांपासून सुरु असलेलं रशिया-युक्रेन युद्ध आता संपण्याची चिन्ह निर्माण झालीत. या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये काही वेळापूर्वी चर्चेची एक फेरी पार पडलीय. ज्यामध्ये काही मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याची माहिती मिळतेय. त्याच वेळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातही लवकरच चर्चेची फेरी होऊ शकते. यामुळे गेल्या एका महिन्यापेक्षा जास्त सुरु असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर येण्याचे संकेत मिळतायत.
Continues below advertisement