Russia Ukraine War: खारकिव्ह स्थानकावर नागरिकांची गर्दी, हल्ल्यात विमानतळ उद्ध्वस्त ABP Majha

Continues below advertisement

रशिया युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. आजही युद्धाचा वणवा पेटताच आहे. युक्रेनमधील मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्यानं जोरदार हल्ले सुरू ठेवले आहेत. दुसरीकडे या युद्धामुळे आता कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केलेय. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत १३० डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. २०१२ साली ही किंमत १२८ डॉलर्सवर पोहोचली होती. मात्र आता तोही रेकॉर्ड तुटलेला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाल्यानं आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram