Russia-Ukraine crisis : युद्धाचे ढग, तणावाखाली जग; चर्चेतून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर भारत ठाम
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी जगाचं लक्ष लागलेल्या रशिया-युक्रेनमधल्या युद्धजन्य परिस्थितीची... रशिया-युक्रेनचं सैन्य आमनेसामने आल्यानं जगात तणाव वाढलाय.... दोन देशांमधली युद्धजन्य परिस्थितीचे भारतावरही परिणाम होणार हे निश्चित.. पूर्व युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना रशियाकडून स्वतंत्र
राष्ट्राचा दर्जा दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग आलाय.. डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना व्लादिमीर पुतिन यांनी स्वतंत्र देश घोषित केल्यानंतर अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.. रशियावर निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचं ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलंय.. तर आम्ही कुणालाच घाबरत नाही अशा शब्दात युक्रेननं रशियाला प्रत्युत्तर दिलंय.. त्यामुळं हा वाद चिघळण्याचीच शक्यता आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या अभ्यासकांकडून वर्तवली जातेय..दरम्यान चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यात यावा अशी भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडली... तिकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहोचलंय... आज रात्रीपर्यंत हे विमान विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येईल