Russia vs Ukraine : 1 लाख रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेवर दाखल, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला
Continues below advertisement
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. सध्या 1 लाख रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेवर दाखल झालं आहे. बेला रशियन आणि युक्रेनियन सीमेजवळील शहरांमध्ये हजारो रशियन तुकड्या आणि सैनिक जमा झाल्याचे सॅटेलाईट फोटो मॅक्सार टेक्नॉलॉजी या अमेरिकन कंपनीने प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान हे रशियन सैन्य युक्रेनचा काही भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. यापूूर्वीही रशियाने युक्रेनवर हल्ला कऱण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४ रशियाने युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमियावर कब्जा केला होता. त्यामुळे या देशांमध्ये कायम संघर्षाचं वातावरण असतं. दरम्यान रशियाने युक्रेनच्या सीमेवर 1 लाख सैन्य पाठवल्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली आहे.
Continues below advertisement