Zydus Cadila Vaccine : झायडस कॅडिला लस फक्त प्रौढांनाच, 12 वर्षांवरील मुलांना तुरतास लस नाही...
झायडस कॅडिलाची कोरोना प्रतिबंधक लस ही आता फक्त 18 वर्षांवरील नागरिकांनाच दिली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. याआधी ही लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यास देशाच्या औषध नियंत्रकांनी परवानगी दिली होती, मात्र देशाच्या लसीकरण कार्यक्रमात तरी ती सध्या फक्त प्रौढांनाच दिली जाणार आहे. झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह डी लशीचे 1 कोटी डोस खरेदीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ऑर्डर दिली आहे. ही लस 12वर्षांखालील मुलांना वापरण्याबाबत तज्ज्ञांचं मत घेतल्यानंतर निर्णय घेणार, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं.