Badlapur : भटक्या कुत्र्यांना बिस्कीट का खाऊ घालताय? सोसायटी सदस्य भिडले, मारहाणीचा Video Viral

बदलापुरातील हेंद्रेपाडा परिसरात श्रीकृष्ण इस्टेट सोसायटी आहे. इथले रहिवासी दीपक रामपरिया हे रोज भटक्या कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालतात. याच सोसायटीत राहणाऱ्या जिया मिश्रानी यांनी भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेटच्या बाहेर जाऊन खाऊ घाला, असं दीपक रामपरिया यांना सांगितलं. मात्र त्यावरून त्यांच्यात वाद होऊन दीपक रामपरिया यांनी जिया यांच्या पतीशी धक्काबुक्की केली. हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. भटक्या कुत्र्यांवरून झालेला हा वाद थेट शिवीगाळ आणि हाणामारीवर आला आणि त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola