Queen Elizabeth Death Special Report : बेकहॅमनं साश्रूनयनांनी घेतलं राणीचं दर्शन
इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमनं आज तब्बल तेरा तास रांगेत उभं राहून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं अंत्यदर्शन घेतलं. सेंट्रल लंडनमधल्या वेस्ट मिनिस्टरमध्ये राणीचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आपल्या लाडक्या राणीच्या अंत्यदर्शनासाठी साडेसात लाखांहून अधिक नागरिकांनी रांग लावली होती.