Yogesh Thakkar on Pune Sex Tantra: पुण्यात सेक्स तंत्र शिबिराची जाहिरात, ओशो अनुयायांना काय वाटतं?

आतापर्यंत तुम्ही अनेक तंत्रांबद्दल ऐकलं असेल.. मात्र कधी सेक्स तंत्राबद्दल ऐकलंय का?  सध्या पुण्यात सोशल मीडियावर याच सेक्स तंत्राची जाहिरात व्हायरल होतेय.. सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशननं नवरात्रीमध्ये १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान तीन दिवसीय कोर्सचं आयोजन केलंय. आणि ज्याला हे सेक्स तंत्र शिकून घ्यायचं आहे त्यांना १५ हजारानं खिसा रिकामा करावा लागणार आहे.. आयोजकांशी संपर्क साधण्यासाठी जाहिरातीवर एक क्युआर कोड देखील देण्यात आलाय. दरम्यान सेक्स तंत्र नावाच्या भानगडीला मनसे, तृप्ती देसाई आणि काही धार्मिक संघटनांनी विरोध केलाय. आज पुणे पोलिस आयुक्तांना भेटून कारवाई संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी देखील यासंदर्भात अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली असून, हे कायद्याच्या चौकटीबाहेर आहे का याचा तपास सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola