मुलांनी गैरवर्तन केलं तर आईवडिलांना शिक्षा! China मध्ये मुलांसाठीच्या कायद्यात तरतूद करण्याचा विचार
Continues below advertisement
मुलं चुकली तर आईवडील पालकांना धपाटा घालतात, पण आता मुलं चुकली तर आईवडिलांच्याच पाठीत धपाडा पडणार आहे. ऐकून थोडं वेगळं वाटलं ना?. पण चीनमध्ये नव्या कायद्यात अशीच तरतूद केली जाणार आहे. या कायद्यानुसार चीनमध्ये मुलांनी गैरवर्तन केलं तर आईवडिलांना शिक्षा करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. नव्या कायद्यात मुलांनी गैरवर्तन केल्यास पालकांना शिक्षा देण्याची तरतूद करण्याचा विचार असून या कायद्यावर अंतिम विचार सुरू आहे. कुटुंबाकडून संस्कारांचा अभाव हेच अल्पवयीन मुलांच्या गैरवर्तनाचं प्रमुख कारण असतं. त्यामुळे नव्या कायद्यानुसार पालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. याशिवाय चीनमधल्या नव्या कायद्यात मुलांसाठी खेळ, व्यायाम आणि आराम करण्याच्या वेळाही ठरवण्यात येणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
China