PM Modi in Washington D C : वॉशिंग्टन विमानतळावर शाही स्वागत, मोदींसाठी गार्ड ऑफ ऑनर

Continues below advertisement

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. न्यूयॉर्कमधील योगदिनाचा कार्यक्रम आटोपून मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाले. तिथं मोदींचं शाही स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांना अमेरिकेनं विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या प्रसंगी अमेरिकन सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे मोदींचं विमान लँड झालं तेव्हा पाऊस पडत होता. मात्र भर पावसातसुद्धा गार्ड ऑफ ऑनर मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न आहे, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देखील म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram