Christmas Tree : पॅलेस्टियन ख्रिश्चन नागरिकांनी ख्रिसमस ट्रीभोवतालच्या रोषणाईसाठी गर्दी

पॅलेस्टियन ख्रिश्चन नागरिकांनी ख्रिसमस ट्रीभोवतालच्या रोषणाईसाठी गर्दी केली. गाझामधील वायएमसीए येथे ही सेलिब्रेशनची तयारी पाहायला मिळाली. गाझा पट्ट्यामध्ये अंदाजे २० लाख मुस्लिम वस्ती आहे, त्यात सुमारे एक हजार लोक ख्रिश्चन आहेत. यातील बहुसंख्य ग्रीक वंशाचे आहेत. 
गाझावर ताबा मिळवल्यानंतर हमास या कट्टरपंथीय संघटनेकडून ख्रिश्चन अल्पसंख्यांकाना त्यांचे सण साजरे करण्याची परवानगी दिली जाते. मात्र ते सण त्यांना सार्वजनिकरित्या साजरे करता येत नाहीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola