Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये हजारा एक्स्प्रेसला अपघात , 7 ते 8 डबे रुळावरून घसरले
पाकिस्तानात रविवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 33 जणांचा मृ्त्यू झालाय. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींना नवाबशहा येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. कराचीहून रावळपिंडीला जाणारी हजारा एक्स्प्रेस शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान रुळावरून घसरली.