Marathi Drama : दुर्मिळ मराठी नाटकांचे होणार जतन, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांना अनुदान मिळणार
Continues below advertisement
मराठी रंगभूमीला कित्येक शतकांचा इतिहास आहे. नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी रंगभूमीच्या कित्येक शतकांच्या प्रवासात अनेक मैलाचे दगड ठरलेले नाट्याविष्कार सादर झाले आणि ही परंपरा आजही अबाधित आहे.महाराष्ट्राची नाट्य संस्कृती आणि दुर्मिळ नाटकांचा अनमोल ठेवा आता जतन केला जाणार आहे. राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून जुन्या दर्जेदार आणि दुर्मिळ मराठी नाटकांचे जतन करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे.
Continues below advertisement