Pakistan: नमाज पठण सुरु असताना आत्मघातकी हल्ला, 56 मृत्यू ABP Majha

पाकिस्तानमधील पेशावरमधील एका मशिदीत मोठा बॉम्बहल्ला झाला आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 56 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 80 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती जिओ न्यूजनं दिली आहे.  शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका आत्मघातली बॉम्बरनं स्वत:ला गर्दीमध्ये स्फोटकांनी उडवून दिलं. या हल्लानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु झालं आहे.जखमींची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप हा हल्ला कुणी घडवला याबाबत माहिती मिळालेली नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola