Pakistan : पाकिस्ताचा तालीबानी चेहरा! स्वातंत्र्यदिनी 400 जणांकडून महिलेशी दुष्कृत्य ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2021 01:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानात तालिबान्यांमुळे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र पाकिस्तानचा तालिबानी चेहरा दाखवणारी दृश्यं समोर आलीत. एक, दोन नव्हे तर तब्बल चारशे जणांच्या समूहाने एका महिलेला घेरत तिची छेड काढली. धक्कादायक म्हणजे ही घटना पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १४ ऑगस्टला घडलीय. ग्रेटर इक्बाल पार्कमधील राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या मीनार-ए-पाकिस्तान इथं ही घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लाहोर पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय..