Imran Khan May Get Arrested : इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता, तोशखाना प्रकरणी अटक वॉरंट जारी

Continues below advertisement

बातमी पाकिस्तानातून..पाकिस्तानात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. कुठल्याही क्षणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तान पोलीस इम्रान खानच्या घरी दाखल झाले असून इम्रान खानच्या निवासस्थानाबाहेर त्याच्या समर्थकांनी मोेठी गर्दी केलीये. इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने 28 फेब्रुवारीला अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केलं होतं. तोशखाना प्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस आज इम्रान खान यांना फक्त नोटीस देण्यासाठी गेली आहे. अटकेची कारवाई नंतरही केली जाण्याची शक्यता आहे. 

 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram