North Korea Ballistic Missiles : रेल्वेतून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; उत्तर कोरियाचा कारनामा
Continues below advertisement
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये शस्त्रास्त्रांची वाढती स्पर्धा जगासाठी डोकेदुखी होऊ लागलीये. उत्तर कोरियानं पाणबुडीच्या माध्यमातून बेलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर लगेचच दक्षिण कोरियानंही बेलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. आता उत्तर कोरियानं रेल्वेच्या माध्यमातून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी केलीये. उत्तर कोरियानं ट्रेनमध्ये बनवलेल्या क्षेपणास्त्र सिस्टिमच्या माध्यमातून पहिल्यांदाच बेलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
Continues below advertisement