बीकेसीच्या एमटीएनएल जंक्शनसमोरील दुर्घटना, दुर्घटनेत २१ मजूर जखमी
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काम सुरु असलेला एक मोठा पूल कोसळला असून त्यामध्ये जवळपास 21 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. हा MMRDA चा प्रोजेक्ट आहे. या पुलाच्या माध्यमातून SCLR ला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला जोडण्यात येत आहे.(MMRDA bridge in Bandra Kurla complex collapses). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा बीकेसी परिसरात एमएमआरडीएच्या पुलाचं काम सुरु होतं. पहाटे साडेचारच्या सुमारास पूल कोसळला. त्यावेळी या पुलावर 22 ते 24 कामगार काम करत होते. पूल कोसळला त्यावेळी काही कामगारांनी घाबरुन पाण्याच्या टाकीत उडी मारली, तर काहींनी पुलाला असलेल्या सळईला पकडून लटकले. तर या पूल दुर्घटनेत 13 ते 14 जण अडकून जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्याच व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.