Diwali 2021 NASA : ताऱ्यांच विलाेभनीय फोटो शेअर करत NASA ने भारतीयांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा

नासाने भारतीयांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतांना प्रकाशमय झालेल्या भारताचा नाही, तर प्रकाशाची उधळण करणाऱ्या अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाचा एक फोटो नासाने प्रसारीत केला आहे. ‘ Happy Diwali to all who celebrate!’असं या संदेशात नासाने म्हंटलं आहे. दिवाळीमध्ये प्रकाशाचा झगमगाट आणि फटाक्यांमुळे वेगवेगळ्या रंगांची उधळण होत असते, अशी उधळण ही अवकाशातही कायम सुरु असल्याचं फोटोच्या माध्यामातून शुभेच्छा देतांना नासाने सांगितलं आहे.नासाच्या 'हबल' या अवकाश दुर्बिणीने हा फोटो घेतला असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola