NASA Artemis 1 Launch : NASA चे मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच
NASA Artemis Moon Mission : यूएस स्पेस एजन्सी 'नासा' (NASA) मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच केले आहे. हे प्रक्षेपण आज फ्लोरिडा (Florida) येथील केनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आले आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे.आर्टेमिस-1 ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. नासा या मिशनच्या माध्यमातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवत आहे. हे यान 42 दिवसांत चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येईल. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.