Bulgaria Accident : बल्गेरियात पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू
abp majha web team
Updated at:
25 Nov 2021 11:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबल्गेरिया देशात एका पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर, सात जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्तानबुलहून एक पर्यटकांची बस बल्गेरियात आली होती. त्यावेळी या बसला अपघात झाला आणि बसने पेट घेतली. मात्र अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.