Shakti Mill Case : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज तीन आरोपींच्या शिक्षेवर निर्णय
2013 साली संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्य सरकारच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज फैसला सुनावणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी दिलेलं आव्हानही हायकोर्टानं 3 जून 2019 रोजी फेटाळून लावलं होतं. त्यानंतर शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे झाली. त्यावर खंडपीठ आज सकाळी साडेदहा वाजता निकाल देणार आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अन्सारी या तिघांना सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती.