Lockdown in china: चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक! चांगचुंग (Changchun) शहरात लॉकडाऊन
Continues below advertisement
Lockdown: कोरोना विषाणूननंतर (Coronavirus) चीनमध्ये (China) नव्या विषाणूचा उद्रेक होण्याच्या भीतीनं चीनमधील 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुंग (Changchun) शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचं जाळं पसरलं. या भयंकर विषाणूमुळं अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यातच नव्या विषाणूमुळं चांगचुंग शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड भिती पसरलीय.
Continues below advertisement