काबुलीवाला ते कबाडखाना... Afghanistan का बनलं डंपिंग ग्राऊंड? अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीला America किती जबाबदार?
तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यापासून अनेक भयानक घटना घडत आहे. लोकं देश सोडून पळून जात आहेत. या काळात अनेक लोकांचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. तालिबानच्या राजवटीत सर्वात मोठा धोका स्त्रियांना आहे, ज्या भयभीत होऊन स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत तालिबान्यांचा पुन्हा एकदा क्रूर चेहरा समोर आला आहे. ज्यावरून असे दिसून येतंय की केवळ महिलाच नाही, समलिंगी समुदायाचे लोक (LGBTQ Community) देखील तालिबानी राजवटीत धोक्यात आहेत.
डेली मेलच्या अहवालानुसार, काही तालिबान्यांनी एका समलिंगी व्यक्तीला मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर बलात्कार केला. हे नराधम तिथेच थांबले नाही, त्यांनी त्या पीडित व्यक्तीकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेतला आणि त्यांना फोन करुन त्यांचा मुलगा समलिंगी असल्याचे सांगितले. ही संपूर्ण बाब अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घडली आहे. अहवालांनुसार, अनेक समलिंगी लोकांना अफगाणिस्तानमध्ये त्यांची ओळख लपवण्यास भाग पडत आहे. कारण त्यांना तालिबानकडून मोठा धोका आहे. तालिबान समलैंगिक लोकांच्या जीवावर उठल्याचे सांगितले जात आहे.