Adulterated Tea : Solapur मधील KGT चहा कारखान्यावर धाड, चहामध्ये भेसळ, आरोग्यावर काय होणार परिणाम?
Solapur : आपल्यापैकी अनेकजण सकाळची सुरुवात चहा पिऊनच करतात. दिवसभर काम करून थकल्यानंतर अंगातील क्षीण घालवण्यासाठी देखील अनेक जण चहा पीत असतात. तुम्ही देखील असेच चहा प्रेमी असाल तर तुम्हाला सतर्क करणारी एक बातमी. सोलापुरात चहा पावडरमध्ये खाद्यकलरची भेसळ केली जात असल्याचा संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल 2 हजार किलो चहा पावडर जप्त करण्यात आलीय.