Israeli Lebanese conflict : इस्रायलचा लेबनॉनवर जोरदार हल्ला, युद्धभूमीतून ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement

Israeli Lebanese conflict : इस्रायलचा लेबनॉनवर जोरदार हल्ला, युद्धभूमीतून ग्राऊंड रिपोर्ट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर लेबनॉनच्या दक्षिणेतील नबातिह शहर उध्वस्त, इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात अनेक इमारती कोसळल्या. 

लेबनॉनमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इस्रायलच्या सैन्याला रोखलं, यामध्ये ८ इस्रायली सैनिक मारले गेल्याची हिजबुल्लाहचे प्रवक्ते मोहम्मद अफीक यांची माहिती.

लेबनॉनची राजधानी बेरुतवर इस्रायलने जोरदार हल्ला केला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर अनेक लेबनीज् नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा हिंसाचार तातडीने थांबवा असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघाने केलं आहे. लेबनॉनच्या बेका खोऱ्यात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ४ लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलच्या या हवाई हल्ल्याला हिजबुल्लाहने प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायली हेलिकॉप्टर्सवर हिज्बुल्लाहने सरफेस टू एअर मिसाईलचा मारा केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram