Israel Conflict : हमासच्या हल्यात ३०० इस्रायलींचा मृत्यू तर इस्रायल हल्यात 400 पॅलेस्टिनींचा मृत्यू

Continues below advertisement

अंतर्गत यादवीने गेल्या वर्षभरापासून अनेक आघाड्यांवर हैराण असलेल्या इस्त्रायलला अत्यंत बेसावधपणे हमासने घुसून टार्गेट केल्यानंतर रक्ताचा पाट वाहू लागला आहे. इस्त्रायलने अत्यंत कडक प्रत्युत्तर देताना गाझापट्टीवर बाॅम्बचा पाऊस पडला आहे. हमास आणि इस्त्रायलमध्ये  घनघोर संघर्ष सुरु असतानाच आता उत्तरी इस्त्रायलमध्ये डोकेदुखी वाढली आहे. हमासप्रमाणेच लेबनाॅनमधील संघटना असलेल्या हेजबोल्लाहने मोर्टार डागले आहेत. उत्तरी इस्त्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी सुद्धा घेतली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram