Iraq Crisis: आखाती देशांमध्ये युद्ध भडकणार? ABP Majha

एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जग चिंतेत असताना आता आखातामध्ये युद्ध भडकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. इराकच्या इर्बिल शहरात क्षेपणास्त्र हल्ले झालेत. इराणने हे हल्ले केल्याची माहिती मिळतेय. इराकमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यात आलाय.  इराणमधून डागण्यात आलेली ही १२ क्षेपणास्त्र अमेरिकन दूतावासाजवळ कोसळलीत. दरम्यान मोसादच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याची माहितीही समोर येतेय. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून अमेरिकेला उकसवण्याचा प्रयत्न असल्याचे बोेललं जातंय. त्यामुळे आता अमेरिका पलटवार करणार का याकडं लक्ष लागलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola