Portugal मध्ये भारतीय गर्भवती महिलेचा मृत्यू,आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी दिला राजीनामा
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोर्तुगालमध्ये भारतीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानं तिथल्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिलाय. पोर्तुगालमध्ये फिरायला गेलेली ३४ वर्षीय भारतीय महिला गर्भवती होती. प्रसूतीसाठी ती रुग्णालयात गेली. पण बेड उपलब्ध नसल्यानं तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं ह्रदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी घेऊन पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. भारतात अशी एखादी घटना घडली की तिचं खापर एकमेकांवर फोडण्याचं राजकारण सुरु होतं... मात्र त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारणारे राजकारणी दुर्मिळच.. आणि याच दुर्मिळ राजकीय नैतिकतेचं दर्शन मार्टा टेमिडोंनी घडवलंय